रॅलीमध्ये ७०० विद्यार्थी व नागरिक शिक्षकांचा समावेश; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे उपक्रम
भोसरी (Pclive7.com):- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भोसरी इंद्रायणीनगर येथे ३५० फुट लांब भव्य तिरंगा रॅली सकाळी ९ ते ११ यावेळेत काढण्यात आली. यारॅलीमध्ये ७०० विद्यार्थी, शिक्षकांसह १००० जण यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रायणीनगर कार्यवाह गिरीश पटेल, प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापक अॅड. अर्पिता दीक्षित, मुख्याध्यापक जाधव मॅडम. उपमुख्याध्यापक पायल सिन्हा, सामाजिक कार्यकर्ते शिवराज लांडगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री कुलकर्णी, शहर मंत्री सिद्धार्थ लाड, ओम रेड्डी, कार्तिक पवार संजय जगताप, अभिषेक मडिगेरी, ऋषभ जमदाडे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक सहभागी झाले होते.

इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेपासून रॅलीला सुरुवात झाली. पुढे मिनि मार्केट, महादेव मंदिर, समर्थ कॉलनी, श्री स्वामी समर्थ शाळा, तिरुपती चौक मार्गे श्री वैष्णोमाता मंदिराजवळ आल्यानंतर तिरंगा रॅलीचा समारोप झाला. प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्य़ेने या रॅलीत सहभागी झाले होते. तर, रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उघळण करीत स्वागत करण्यात आले. सोबत साऊंड स्पीकर DJ वर देशभक्तीपर गाणे लावले होते. शेवटी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले.

























Join Our Whatsapp Group