पिंपरी (Pclive7.com):- महेश सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी अजय बुलाखीदास लढ्ढा यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी कामकाज पाहिले. जुगलकिशोर पुंगलिया हे बँकेचे अध्यक्ष आहेत.
बँकेचे उपाध्यक्ष अजय लढ्ढा यांनी संचालकांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले असून, पुढील कालावधीत बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या सोबत अविरत काम करून बँकेची सर्वांगीण प्रगती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सध्या बँकेचा एकूण व्यवसाय १४०८ कोटींचा असून बँकेस ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे, तसेच रिझर्व्ह बँकेचे निकषाप्रमाणे बँक “आर्थिकदृष्ट्या सक्षम व चांगले व्यवस्थापन” असलेल्या श्रेणीत येते. बँकेचे नेट एनपीए प्रमाण शून्य टक्के असून बँकेने सातत्याने सभासदांना लाभांश दिला आहे, अशी माहिती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद एम. गावसाने यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group