नवी दिल्ली (Pclive7.com):- भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिलजमाईचा संदेश देण्यासाठी राष्ट्रवादीला जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा कोणी लढवायची यावरून संभ्रम कायम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावर अंतिम निर्णय घेतील, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले होते.पोटनिवडणुकीवरून मतभेद नाहीत. भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करणे हेच ध्येय असल्याचे पटोले म्हणाले.
























Join Our Whatsapp Group