जम्मू कश्मीर (Pclive7.com):- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात किमान २७ पर्यटक ठार झाले असल्याची भीती व्यक्त होत असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातीलही दोन पर्यटक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. पुण्यातील पाच जणांच्या कुटुंबावर गोळीबार झाला. त्यात दोघे जखमी झाल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला. ४० ते ५० राऊंड फायर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात एक नवविवाहित जोडपेही अडकलं. पत्नीच्या सांगण्यानुसार, तिच्या पतीचा धर्म विचारल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या मृत पर्यटकांची नावे आहेत. तर दोन पर्यटक जखमी असून एकजण पनवेलचे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
धर्म विचारून गोळ्या झाडल्या
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.
पर्यटकांसाठी २४ तास मदत सेवा उपलब्ध
या घटनेनंतर काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, अनंतनाग पोलीस कंट्रोल रूममार्फत २४ तास कार्यरत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांनी कोणतीही अडचण भासल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल : ९५९६७७७६६९
लँडलाईन : ०१९३२-२२५८७०
व्हॉट्सॲप : ९४१९०५१९४०


























Join Our Whatsapp Group