पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज (दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, निवडणूक प्रचार प्रमुख नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, अजित गव्हाणे, कैलास बारणे, सतीश दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
काल राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा झाली, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी दंड थोपटले आहेत. आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड मधील शिवसेना भाजपाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन भोसले यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सचिन भोसले थेरगाव प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक आहेत. पक्षांतर्गत नाराजी आणि प्रभागात ज्या भागात त्यांची ताकद होती तोच भाग तोडून दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आला होता, तेव्हा देखील त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता त्यांनी शिवबंधन काढून टाकत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले असून त्यांच्या प्रवेशामुळे या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे.
























Join Our Whatsapp Group