पिंपरी (Pclive7.com):- मैत्रीपूर्व लढत करावी अस सांगितल्यावर पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या माजी नगरसेवका आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी थेट अजितदादा पवारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. भाजपने काम केली नाही त्यांनी दबाव टाकून मागील काही वर्ष काम करू दिली नाहीत असा थेट आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितल आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. तर भाजपने कामच केलं नाही कोणता विकास केला नाही अस आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला असून, त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहरप्रमुख रुपाली आल्हाट, सौ. साधना नेताजी काशिद आणि विशाल आहेर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, अपक्ष नगरसेविका आणि नवोदित इच्छुक कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सध्या योग्य वेळेची प्रतीक्षा सुरू असून, आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना हा मोठा धक्का मानला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडमध्ये आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील राजकारणात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.























Join Our Whatsapp Group