चिंचवड (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा महिला कार्याध्यक्षपदी वैशाली संदेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.

वैशाली काटे यांना दिलेल्या नियुक्तीपात्रात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहाल. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास कविता आल्हाट यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत वैशाली काटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, उपाध्यक्ष अश्विनी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते संदेश महादेव काटे, दिपाली संतोष काटे, प्रियांका राहुल काटे, वैभव अभंग मुळे, गणेश वाघमारे, प्रशांत सोनटक्के आदी उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group