पिंपरी (Pclive7.com):- बीटीसी आणि युएसडीटी ट्रेडिंग केल्यास दररोज शंभर डॉलर परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका नागरिकाची ९६ लाख ९३ हजार २८९ रुपयांची फसवणूक केली. ही घटना रावेत येथे घडली. याबाबत रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील रोड वरील रॉयल कासा या सोसायटीत राहणाऱ्या एका पुरुषाने शनिवारी (दि.२६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एक मोबाइल धारक आणि बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जुलै २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये रावेत येथे घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्याशी संपर्क केला.

बीटीसी आणि युएसडीटी ट्रेडिंग गुंतवणूक केल्यास दररोज १०० डॉलर परतावा मिळेल असे आमिष दाखवले. तसेच नफ्यातील २०% रक्कम ऑनलाईन पद्धतीने कमिशन म्हणून द्यावी लागेल, असेही सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ९६ लाख ९३ हजार २८९ रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

























Join Our Whatsapp Group