पिंपरी (Pclive7.com):- पावसाळा काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसात चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.
याची अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रभागातील सर्व चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर साफसफाई करण्याबाबत अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल जेणेकरून पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही सांगितले.























Join Our Whatsapp Group