
सकारात्मक आर्थिक परिणाम अपेक्षित
या कररचनेमुळे सरकारी तिजोरीत अंदाजे ४८,००० कोटी रुपयांचा महसूल वाढेल, असा अंदाज महसूल सचिव अजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तसेच, ही नवीन करप्रणाली आर्थिकद़ृष्ट्या शाश्वत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीएसटी कौन्सिलची ही ५६ वी बैठक तब्बल साडेदहा तास चालली. यामध्ये केंद्र आणि राज्यांनी अनेक महत्त्वाच्या कर प्रस्तावांवर सहमती दर्शविली.
0% GST
औषधे : कर्करोग आणि दुर्मीळ आजारांवरील उपचारांसह 33 जीवनावश्यक औषधे.
विमा : वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी.
शैक्षणिक साहित्य : नकाशे, चार्ट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल, वह्या, नोटबुक, खोडरबर.
5% GST
दैनंदिन आणि आरोग्यविषयक वस्तू
वैयक्तिक काळजी : केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम.
खाद्यपदार्थ : लोणी, तूप, चीज, डेअरी स्प्रेडस्, नमकीन.
घरगुती आणि शिशू उत्पादने : भांडी, बाटल्या, डायपर.
वैद्यकीय उपकरणे : थर्मामीटर, वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन, निदान किट, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स.
इतर : चष्मे, शिवणयंत्र आणि त्यांचे भाग.
18% GST
टिकाऊ वस्तू आणि वाहने
उपकरणे : एअर कंडिशनर, दूरदर्शन संच, डिशवॉशर.
वाहने : लहान कार, 350 सी.सी.पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, बस, ट्रक, रुग्णवाहिका.
इतर : ऑटो पार्टस्, तीनचाकी वाहने, सिमेंट.
40% GST
हानिकारक आणि चैनीच्या वस्तू
तंबाखू उत्पादने : पानमसाला, सिगारेट, गुटखा, चघळण्याचा तंबाखू, बिड्या.
पेये : साखर किंवा फ्लेवर असलेली सोडा पेये, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल नसलेली पेये.
उच्च श्रेणीतील वाहने : 350 सी.सी.पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकल, यॉट, खासगी हेलिकॉप्टर, जेट.
‘या’ वस्तू स्वस्त
पनीर, चपाती, रोटी आणि पराठा यासारख्या वस्तूंना पूर्वी 5 टक्के कर लागत होता, तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.
‘या’ वस्तू महाग
सिगारेट आणि पानमसाल्यासारख्या वस्तूंवर आता 40 टक्के असा सर्वाधिक कर लागेल.



























Join Our Whatsapp Group