पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गेल्या ८ महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व शितल काटे यांचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या प्लास्टिक बंदी अभियाना अंतर्गत आज या परिसरातील नागरिकांना नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्लस्टिक बंदी निर्णया अंतर्गत काल दि.२३ जून पासून नागरिकांवर व दुकानदारांवर कडक व दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या दंडात्मक करवाई पासुन वाचण्यासाठी तसेच प्लास्टिक बंदी बाबत नागरिकांना व दुकानदारांना जागृत करण्यासाठी नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. येथील दुकानदार व विविध गृहनिर्माण सोसायटी याच्यांकडून तब्बल ७० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेला परिसरातील नागरिकांनी व सोसायट्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या पदयात्रेत संतोष म्हसकर, सिध्दार्थ नाईक, सचिन देसाई, संतोष मिश्रा, विक्रम मोहीते, पराग त्यागी, अंबरीश जोशी, तुषार जळमकर, अशोक सोनावणे, सतीश होळकर, अभय चितळे, शंकर काटे, कैलास कुंजीर, सतीश डोंगरे, तसेच परिसरातील व्यापारी, छोटे दुकानदार, व नागरिक आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांना २० हजार पिशव्यांचे वाटप करण्यात आले.























Join Our Whatsapp Group