मुंबई (Pclive7.com):- मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बागायतीसाठी प्रतिहेक्टर 32 हजार 500 रुपये, तर हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये मिळणार आहे. आज (7 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नुसकानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची काम देणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी केली.

राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज..
खरडून गेलेल्या शेतीला ४७ हजार हेक्टरी आणि ३ लाख हेक्टरी
नरेगाच्या माध्यमातून जवळपास साडेतीन लाख हेक्टरी भरपाई
दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत
गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी
पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत
गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
परीक्षा शुल्कात माफी करणार

पीक नुकसानभरपाई..
रब्बीचे पिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये
हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी 27 हजार रुपये
बागायती शेतीसाठी हेक्टरी 32 हजार रुपये
विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये
कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार.
शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज..
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे, तर ताण सहन करावा लागेल. इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.