पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील एका वडापाव विक्रेत्याकडून निगडी पोलिसांनी एक गावठी बनावचीचे पिस्टल आणि जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथील भाजी मंडईत करण्यात आली.
सागर श्रीराम संकपाळ (वय-३४ रा. साई चौक, साईनगर, देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चिखली येथील भाजीमंडईत वडापावची विक्री करणाऱ्याकडे पिस्टल असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संकपाळ याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जीवंत काडतूस असा एकूण चाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.





















Join Our Whatsapp Group