पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी व पवना नदी तीरावर यावर्षी मोठ्या प्रमाणात छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर आयोजित केलेल्या या उत्सवात अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजुदास महाराज यांनी पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच येऊन भक्त भाविकांना शुभाशीर्वाद दिले.

गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पिंपरी चिंचवड शहरातील कानाकोपऱ्यातून हजारो भक्त भाविक सहकुटुंब उपस्थित होते. येथे होणाऱ्या धार्मिक उत्सवात दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच आहे, त्यामुळे या घाटाची लांबी वाढवावी तसेच व्यासपीठ व इतर सेवा सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात यासाठी आपण लवकरच आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांची भेट घेणार आहोत अशी माहिती श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली. मंगळवारी छटपूजा महोत्सवाची सांगता झाल्यानंतर विश्व श्रीराम सेनेच्या स्वयंसेवकांनी मोशी येथील इंद्रायणी घाट व परिसर साफसफाई करून स्वच्छता केली.

यावेळी गुप्ता यांनी महंत श्री राजूदास महाराज, आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने, सुधीर काळजे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, विकास पाटील, संदीप साकोरे व छटपूजा निमित्त आलेले भक्त, भाविक, पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य व अग्निशमन विभागाचे आभार व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group