
पिंपरी (Pclive7.com):- पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सी मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. आशा संजय गवळी (वय ५२) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

आशा संजय गवळी आज सकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी टाकीजवळ गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या डोक्याला देखील मार लागला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आशा गवळीचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदन अहवालासाठी वायसीएम हॉस्पिटल मध्ये पाठवला.

पाण्याच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या आशा गवळी यांच्या मुलाचे लग्न ४ नोव्हेंबरला होणार आहे. मात्र लग्न सोहळ्यापूर्वीची आशा गवळी यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गवळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
























Join Our Whatsapp Group