पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि सांगवी पोलीस ठाणे यांच्या वतीने लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता दौड’ म्हणजेच Run For Unity मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील शहरवासीयांसोबत या एकतेच्या उत्सवात सहभागी झाले होते.

या उपक्रमाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या एकात्मतेचा, अभिमानाचा आणि राष्ट्रभावनेचा उत्सव साजरा करण्यात आला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळ देत सर्व वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

याप्रसंगी आमदार शंकर जगताप म्हणाले की, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अद्वितीय राष्ट्रनिर्मिती कार्याचे स्मरण करत, देशाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा. खरंतर ‘Run For Unity’ ही केवळ एक स्पर्धा नसून एकतेचा संकल्प आणि राष्ट्रभावनेचा उत्सव आहे, ही भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group