
भरती प्रक्रियेबाबत सूचना देताना उपआयुक्त श्वेता खेडकर, अध्यक्ष – पोलिस भरती समिती यांनी उमेदवारांना इशारा दिला आहे की, “भरती प्रक्रियेत कोणाकडूनही पैशाची मागणी किंवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. तसेच इतर तांत्रिक अडचणी असल्यास भरती समितीचे अध्यक्ष किंवा पोलिस आयुक्त यांच्याशी थेट संपर्क साधावा.”

या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा शारीरिक चाचणी असेल. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेला १०० गुण असतील आणि शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या प्रत्येक १० उमेदवारांमागे १ उमेदवाराची निवड लेखी परीक्षेसाठी होईल. उमेदवारांना पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण आणि लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र ठरतील.
यानंतर दोन्ही परीक्षांच्या गुणांवर आधारित गुणानुक्रम यादी तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची दस्तऐवज तपासणी करण्यात येईल, त्यानंतर तात्पुरती निवड यादी आणि शेवटी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
पात्रता निकष काय..?
उमेदवारांनी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group