
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीमध्ये ११ वर्षांपूर्वी कत्तलखाना सुरू होऊ नये म्हणून अनेक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने सर्व ११ आंदोलनकर्त्यांना त्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.

(सु.भा. शेलार) अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे यांनी आज (दि.०१) चंद्रशेखर अहिरराव, महेश मोटवानी, राकेश आछरा, अशोक रांका, तुषार रांका, कपिल रांका, रश्मी रांका, शिल्पा रांका, कविता सोनिगरा, गायत्री चितळे आणि हिरल चितळे या सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.

या सर्वांना भारतीय दंड विधान कलम १४३, १४५, १४७,१४९, ३५३, ३३२ च्या अपराधांमधून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम २५८ (१) प्रमाणे निर्दोषमुक्त करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group