पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेनकोट आणि गणवेशाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना वेळेत रेनकोट मिळाल्यास शालेय उपस्थिती वाढण्यास मदत होईल.

तसेच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, वितरण आणि वाटपाचे नियोजन तातडीने पूर्ण करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group