भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्यावतीने आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- “चला…अंतरीचा कृष्ण जागवूया… आपण सारे एकत्र येऊया…कृष्णमय होऊया !” या भावपूर्ण आवाहनासह वाकड येथे विश्व विख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून तीन दिवसीय श्री कृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तिरसाचा सोहळा साकार होत आहे. ह्या भव्य-दिव्य सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तीन दिवस सलग श्रीकृष्णलीलेची मायरा कथा, जया किशोरी दीदींच्या मधुर आवाजात थेट श्रवणाचा योग, तमाम वाकड व पिंपरी चिंचवड वाशियांना भक्तिरसात न्हाऊन निघण्याची संधी. २४, २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा वाजता मुंबई-बंगळूरू हायवे शेजारील टीप टॉप हॉटेल जवळ वाकड येथे हा कथा सोहळा रंगणार आहे.

प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. जया किशोरी दीदींच्या कथेने यापूर्वी लाखो भक्तांच्या हृदयात कृष्णप्रेमाचा झरा वहात आहे. वाकड, ताथवडे व पुनावळेतील भक्तांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हा दुर्मीळ अध्यात्मिक सोहळा कुटुंब व मित्रमंडळींसह सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून अंतरीचा कृष्ण जागवावा आणि कृष्णमय व्हावे. असे आवाहन आयोजक राम वाकडकर यांनी केले आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


























Join Our Whatsapp Group