पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात रहाटणीतील कोकणे चौक ते लिओन ओर्बिट सोसायटी येथे चालू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामामुळे सेवा रस्त्यावर द्वारका संक्रिस्त सोसायटी ते कापसे लौन्स खड्डे पडले होते. नगरसेवक नाना काटे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अश्या सूचना देण्यात आल्या. ते खड्डे पालिकेच्यावतीने आधुनिक पद्धतीने बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात रहाटणीत खड्डे पडले होते. नगरसेवक नाना काटे यांच्या सुचनेनंतर महापालिकेतर्फे येथील रस्त्यावरील खड्डे एका विशिष्ट पद्धतीच्या यंत्राच्या सहायाने कोल्ड इमल्शन पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. सध्या महापालिकडे अशी २ यंत्रे उपलब्ध आहेत सदर आधुनिक यंत्राच्या सहायाने बुजविलेल्या खड्याला तीन वर्षाची वैधता असते. तीन वर्षादरम्यान हा खड्डा उखडल्यास पुन्हा संबधित ठेकेदारामार्फत नव्याने तो बुजवण्यात येणार आहे. यंत्राची एकेवेळची क्षमता २०० चौरस मीटरपर्यंतचा परिसर इतका आहे असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल नाना काटे यांनी सदर कामाची पाहणी केली व रहाटणी पिंपळे सौदागर मधील सर्व रस्त्यांची डागडुजी ह्या यंत्राद्वारे कोल्ड इमल्शनने करावी असेही सांगण्यात आले.