इस्लामाबाद (Pclive7.com):- तुरुंगवास भोगत असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाज, जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर यांना दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या कारावासाला स्थगिती दिली आहे.
६ जुलैला अकांउटेबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ, त्यांची मुलगी आणि जावई यांना अनुक्रमे १०, ७ आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांना पनामा पेपर स्कॅममध्ये दोषी ठरविण्यात आले होते.