पिंपरी (Pclive7.com):- हे नाम रे सबसे बडा तेरा नाम…, आजा सनम मधुर चांदणी मे.., चाँद आया है जमी पर, आज गरबे की रात मे.. या गाण्यांवर दांडिया प्रेमींनी ठेका घेताच पूर्णानगर येथे नवरात्र महोत्सवात दांडिया स्पर्धेची रंगत वाढली. यामध्ये तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. त्याचप्रमाणे उत्साहाने नृत्यामध्ये भाग घेण्यात बालचमूही आघाडीवर आहेत. आणि दांडिया प्रेमींचा उत्साह ओसांडून वाहताना दिसत आहे. चिखलीतील प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर येथे श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सव आणि महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सव आणि महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील धनश्री काडगावकर, अभिनेत्री श्वेता महेंदळे, मृणाल कुलकर्णी, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विक्रमादित्य पवार, भाजपचे सांगवी मंडलाध्यक्ष अरुण पवार, सुभाष आहेर, कविता हिंगे, अतुल माने, संदीप मंगवडे, संतोष ठाकुर, अनिल माने, शिवाजी कणसे, रवि पाटील, बाळासाहेब गंगावणे, गोरख पाटील, निलेश सुंभे, नागेश शेट्टी, सिद्धिविनायक नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील धनश्री काडगावकर म्हणाल्या की, नवरात्रोत्सव साजरा करताना आनंदाचे सोने लुटा, असे आवाहन काडगावकर यांनी केले. एकत्र सण साजरा करण्यात ख-या अर्थाने आनंद असतो. उत्सवाच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी एकत्र येवून सण साजरे केले पाहिजेत. या महोत्सवाच्या माध्यमातून पूर्णानगरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तरुणाई आणि महिला यांच्यासाठी असे कार्यक्रम उपयोगी असल्याचे हेरून महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्योगनरीमध्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अभिनेत्री तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील धनश्री काडगावकर, श्वेता महेंदळे आणि मैत्रीचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ या चित्रपटाची अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना पक्षनेते पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या महोत्सवा अंतर्गत दांडिया स्पर्धेतील विजेते यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पक्षनेते पवार यांनी नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
पोपट हजारे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. श्रीकांत कदम यांनी आभार मानले.
























Join Our Whatsapp Group