पिंपरी (Pclive7.com):- १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. त्याचाच निषेध म्हणून शास्तीकराच्या नोटीसींची होळी करत रावण दहन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चिखली येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल सार्वजनिक मंडळाच्यावतीने दसऱ्या निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम गुरुवारी दि.१८ सांयकाळी ६ वाजता साने चौक येथे होणार आहे. यावेळी सिनेअभिनेता डॉ.अमोल कोल्हे व सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित होणार असल्याची माहिती दत्ता साने यांनी दिली.
दत्ता साने म्हणाले, १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. फक्त शासकीय निर्णय झाला असा प्रसार करुन फ्लेक्सबाजी व साखर वाटली गेली. प्रत्यक्षात कृती काहीच नाही. त्यामुळे सामान्य नागरीकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा निषेध म्हणून या रावण दहनाच्या कार्यक्रमात शास्तीकरांच्या नोटीसांचे दहन करण्यात येणार आहे.
























Join Our Whatsapp Group