पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’ ने ५३ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. वायसीएम रूग्णालयात उपचारा दरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला असून शहरातील हा ३३ वा बळी गेला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘स्वाईन फ्लू’ने पिंपरीतील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाला ९ ऑक्टोबर रोजी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्याची प्रकृती खालावत गेल्याने १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान शहरातील विविध रूग्णालयात ११ बाधित रुग्णांवर उपचार सुरू अाहेत. तर थेरगाव येथील खाजगी रूग्णालयात ७ रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या आजाराने मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जानेवारीपासून अाजपर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत.
























Join Our Whatsapp Group