पुणे (Pclive7.com):- मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, मुळच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. एसइबीसी आणि ओबीसी हा एकच प्रवर्ग आहे. घटनेत ओबीसी हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते समता दिन कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवारांबद्दलच्या आरोपांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अजित पवारांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र सादर करणे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना त्रास देण्याचा हेतू आहे. या कारवाईतून सरकारचा हेतू स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. फुले वाडा हे आमचे उर्जाकेंद्र आहे. इथून ऊर्जा घेऊनच आम्ही वर्ष भर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करत असतो. पुण्यातल्या फुले वाडा इथे आयोजित समता पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त आज समता दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group