रहाटणी (Pclive7.com):- स्वर्गीय उपमुख्यमंत्री तथा विकासपुरुष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रहाटणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवेचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक नगरसेवक सागर कोकणे यांनी केले आहे.

“जयंती विकास पुरुषाची… प्रेरणा समाजसेवेची!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदानाद्वारे गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर रविवार दि.१९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगरसेवक सागर खंडुराव कोकणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, रहाटणी येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान द्यावे, असे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक सागर खंडुराव कोकणे व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“एक रक्तदाता… अनेक जीवांचा जीवनदाता!” या संदेशासह नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group