निगडी (Pclive7.com):- कै. किरण सुदाम काळभोर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात सेक्टर २२ मधील अंध व्यक्तींसाठी छत्री वाटप तसेच चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात अंध व्यक्तींना छत्रींचे वितरण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंध बांधवांना दैनंदिन प्रवासात मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास सिद्धिविनायक गणेश मंदिर मंडळाचे अध्यक्ष जयेश भुवड, बाबू ठाकूर, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी, संतोष एकावडे, समीर शिंदे, रफिक शेख, बबनराव दळवी आणि बाल ब्रह्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अंध व्यक्तींना छत्रींचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. किरण सुदाम काळभोर यांच्या स्मृतींना अभिवादन करत समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचे कार्य जिवंत ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन काळभोर आणि सहकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.






















Join Our Whatsapp Group