पिंपरी (Pclive7.com):- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी निगडी येथे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

भक्ती-शक्ती चौक, भक्ती शक्ती सर्कल, टिळक चौक आणि तहसीलदार कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार असल्याने अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती सर्कल मार्ग, अंकुश चौक ते भक्ती-शक्ती सर्कल व टिळक चौक, दुर्गानगर चौक ते टिळक चौक, स्वानंद डेअरी ते भक्ती-शक्ती चौक तसेच खंडोबामाळ चौक, बँक ऑफ महाराष्ट्र चौक आणि काचघर चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

या कालावधीत वाहनचालकांनी भक्ती-शक्ती उड्डाणपूल, रुद्रा पार्किंग, भेळ चौक, अप्पूघर चौक, मुकाई चौक, खंडोबामाळ चौक, गांधी हॉस्पिटल चौक, बसवेश्वर पुतळा आणि कृष्णा हॉटेल मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group