भोसरीतील कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ प्रथम, तर पिंपरी गाव येथील सुवर्णयुग मित्र मंडळाचा द्वितीय क्रमांक
पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून, भोसरी येथील कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळवला आहे. तर पिंपरी गावातील सुवर्णयुग मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या पत्रकार परिषदेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, तसेच विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे आणि उत्तमराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत शहरातील तब्बल २९५ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी १२३ मंडळे बक्षीसपात्र ठरली असून सात मंडळांना सन्मानपत्र देण्यात आले आहे. तसेच १४ शाळांनी सहभाग घेतला होता, त्यातील सात शाळांना पुरस्कार मिळाले आहेत. शहरातील २५ गृहनिर्माण सोसायट्यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ११ सोसायट्यांना बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी एकूण १४ लाख २० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली आहेत.
प्रमुख विजेते मंडळ..
प्रथम क्रमांक : कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ, भोसरी – ₹५१,०००
द्वितीय क्रमांक : सुवर्णयुग मित्र मंडळ, पिंपरी गाव – ₹४५,०००
तृतीय क्रमांक : समस्त गव्हाणे तालीम, भोसरी – ₹३५,०००
चतुर्थ क्रमांक : छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, पिंपळे गुरव – ₹३०,०००
पंचम क्रमांक : समता मित्र मंडळ, काळभोर नगर, आकुर्डी – ₹२५,०००
या स्पर्धेअंतर्गत शहरातील सात गणेश मंडळांना ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जय बजरंग तरुण मंडळ (पवळे उड्डाणपूल, निगडी), जय हिंद मित्र मंडळ ट्रस्ट (प्राधिकरण, निगडी), लांडगे लिंबाची तालीम मंडळ (भोसरी गावठाण), पठारे-लांडगे तालीम मित्र मंडळ (भोसरी), गांधी पेठ तालीम मित्र मंडळ (चिंचवड), एस.के.एफ. मित्र मंडळ (चिंचवड) आणि राष्ट्रतेज तरुण मंडळ (काळभोर नगर) यांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय मुख्य जिवंत देखावे (प्रथम क्रमांक विजेते – २०,०००/-)
प्रभाग ‘अ’: शिवशक्ती मित्र मंडळ, आकुर्डी (विषय: स्त्री शक्तीचा करा हो सन्मान)
प्रभाग ‘ब’: आदर्श तरुण मंडळ, लांडे नगर, चिंचवड (विषय: नृसिंह अवतार)
प्रभाग ‘क’: नव महाराष्ट्र मित्र मंडळ, लांडेवाडी (विषय: वाघाचा वाघ कोंडाजी फर्जद)
प्रभाग ‘ड’: भैरवनाथ तरुण मित्र मंडळ, पिंपळे गुरव (विषय: गुन्हेगारी एक भयानक अंत)
प्रभाग ‘ई’: श्री साईनाथ तरुण मंडळ, मोहन नगर, टेल्को (विषय: डरकाळी वाघाची आग्याच्या थराराची)
प्रभाग ‘फ’: अमरदीप तरुण मित्र मंडळ, पिंपरी (विषय: मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो)
प्रभाग ‘ग’: जय बजरंग मित्र मंडळ, आहेरवाडी (विषय: शिवरायांची आग्र्यातून सुटका)
प्रभाग ‘ह’: शितोळे नगर क्रीडा मंडळ, सांगवी (विषय: संजीवनी वनस्पती)

सामाजिक प्रबोधन व पर्यावरणपूरक देखावे (प्रथम क्रमांक विजेते – १०,०००/-)
प्रभाग ‘अ’: श्रीकृष्णकांती मित्र मंडळ, आकुर्डी (स्त्री: काल, आज आणि उद्या)
प्रभाग ‘ब’: ज्ञानदीप मित्र मंडळ, माळी आळी, चिंचवड (माय मराठीचा गंध)
प्रभाग ‘क’: लोंढे तालीम मित्र मंडळ, भोसरी (शेती आणि माती – विकायची नाय राखायची)
प्रभाग ‘ड’: मोरया तिरंगा मित्र मंडळ, काळेवाडी (पर्यावरणपूरक देखावा)
प्रभाग ‘ई’: माय सेवा प्रतिष्ठान, रुपीनगर (रायगड किल्ल्याची भौगोलिक माहिती)
प्रभाग ‘फ’: ज्योती मित्र मंडळ, पिंपरी (गड किल्ले संवर्धन)
प्रभाग ‘ग’: सौजन्य ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट, सांगवी (सामाजिक प्रबोधन)
प्रभाग ‘ह’: संत नगर मित्र मंडळ, मोशी (वसुंधरेला प्रदूषणाचा विळखा)

स्थिर व हलता देखावा विभाग (प्रथम क्रमांक विजेते – १०,०००/-)
तरुण मित्र मंडळ (आकुर्डी), अखिल मित्र मंडळ (चिंचवड), अष्टविनायक मित्र मंडळ (संत तुकाराम नगर), जय महाराष्ट्र मित्र मंडळ (पिंपळे सौदागर), न्यू स्टार स्पोर्ट्स फाउंडेशन (चिखली), सडना मित्र मंडळ (पिंपरी), राही माई प्रतिष्ठान (सांगवी) आणि जाणता राजा ग्रुप (कासारवाडी).
धार्मिक व पौराणिक देखाव्यांमध्ये शरयू नगर प्रतिष्ठान (प्राधिकर), भोजेश्वर मित्र मंडळ (भोसरी), श्री हनुमान व्यायाम मंडळ (टाळगाव चिखली) आणि सुभाष मित्र मंडळ (जाधव वाडी) यांनी आपापल्या प्रभागात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भालेकर तळवडे, विठ्ठलवाडी आकुर्डी, पिंपळे निलख व नवी सांगवी येथील ८ मंडळांना उत्कृष्ट विद्युत रोषणाईसाठी प्रत्येकी ₹५,००० चे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय २० मंडळांना जिवंत देखाव्यांसाठी प्रत्येकी ₹१०,००० चे बक्षीस आणि ६ महोत्सवी वर्षांच्या मंडळांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, रामदास चिंचवडे, जितेंद्र वडशिंगकर, महेश कोळपकर, मनोज वाखारे, संजय हुलजुते, रमेश खरबडे, बाळकृष्ण मोझर, नितीन खोडदे आणि दत्तात्रय फटांगडे यांनी काम पाहिले. तर संभाजी सूर्यवंशी, मनोज आहेर, राहुल रसाळ आणि रोहन चौगुले यांनी सहाय्यक परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विलास कामठे, बापूसाहेब ढमाले, कैलास भांबुर्डेकर, राजाभाऊ गोलांडे, जगदीश शेट्टी, दत्तात्रय भोंडवे, अनिल वाघेरे, दिलीप माळी आणि श्रीकांत दाखवले यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. डॉ. संतोष ढोरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले, तर महेश सूर्यवंशी यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची आणि स्पर्धेची सविस्तर माहिती दिली.