पिंपरी (Pclive7.com):- दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता देण्यास नकार दिल्याने भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

ही घटना शनिवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदीतील ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ घडली. सिद्धार्थ भीमराव डबडे (६०, रा. ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ, वडगाव रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, हरिओम गणेश पांचाळ (रा. वडगाव रोड, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हरिओम पांचाळ आणि त्याचा साथीदार फिर्यादी यांच्या भाजीपाल्याच्या गाड्यावर आले. त्यांनी फिर्यादीकडे दरमहा पाच हजार रुपये हप्त्याची मागणी केली.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, बाजूला पडलेल्या दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रविवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group