आळंदी (Pclive7.com):- अजा एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आळंदी येथील जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आलेल्या मंदिरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने उजळून निघाला आहे.

एकादशी निमित्त मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी, अभिषेक, भजन-कीर्तन तसेच हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मंदिरातील विशेष पुष्पसजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत असून सजावटीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. फुलांच्या मनमोहक आरासीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेताना भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभत आहे.
एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.




















Join Our Whatsapp Group