पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सांगवी भागातील मतदार, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांनी माजी उपमहापौर माई ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, भाजपच्या नगरसेविका शारदा सोनवणे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान मतदारांशी भेटून त्यांच्याशी देखील चर्चा केली.
भेटीगाठी दौऱ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख स्वरूपा खापेकर, नगरसेवक सचिन भोसले, विजय साने, दीपक ढोरे, अमित सुवासे, चेतन शिंदे, मच्छिंद्र ढोरे, सुभाष ढोरे, आशिष आवळे, मंगला भोकरे, पुष्पा गोसावी, युवराजसिंग गायकवाड, शिवाजी ढोरे, तुषार नवले, नंदू काची आदी उपस्थित होते.
माई ढोरे यांच्या संपर्क कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माई ढोरे यांच्यासह कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर नगरसेविका शारदा सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नगरसेवक अतुल शितोळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्री अनिता शितोळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांचे आशीर्वाद घेतले.
दरम्यान, सांगवी परिसरातील रिक्षाचालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात कटूआ समितीचा अहवाल आला आहे. समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्याची मागणी रिक्षाचालकांनी खासदार बारणे यांचेकडे केली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.





















Join Our Whatsapp Group