पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील बिग इंडिया ग्रुप आणि धिरेंद्र अँडव्हटायझिंगचे नरेंद्र सेंगर यांचे बुधवारी दि.२७ रोजी ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पुणे येथील जहांगीर रूग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड शहरासह पुणे आणि मुंबई परिसरात अॅडव्हटायझिंग क्षेत्रातील नामवंत व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख होती. सतत हसतमुख स्वभावामुळे राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती.
रूपीनगर, निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज गुरूवार दि.२८ रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.