पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील हापूस जातीचा पहिला आंबा पिंपरी कँम्पातील फ्रुट मार्केटमध्ये आला आहे. याशिवाय बदाम आणि लालबाग जातीचे आंबेही विक्रीसाठी आले आहेत. या मोसमातील पहिला आंबा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
हापूस आंब्याला ७०० ते १२०० रूपये प्रति डझन भाव मिळाला असून चारशे रूपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. बदामी आंबा ८० ते १२० रूपये किलो तर लालबाग ७० ते १२० रूपये किलो दराने विकला जात आहे. सध्या आंब्याचे भाव जास्त असल्याने सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही. परंतू आवडीने खाणारे शौकिन हवे त्या किंमतीत या आंब्याची खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत गुडी पाढवा हा सण येत असल्याने बाजारात आंब्याची मागणी वाढणार असल्याचे विक्रेते कुमार शिरसाट यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group