पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दापोडीत गाठीभेटी दौरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचा विजय असो’, ‘खासदार श्रीरंग बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांच्या गजरात खासदार बारणे यांचे स्वागत केले. फुगेवाडी येथील शिवसेना कार्यालयास भेट दिली.

दापोडी परिसरातील महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, तुषार नवले, सुनील ओव्हाळ, विलास हजारे, संजय काटे, राजू सोलापुरे, विनोद जाधव, आदर्श शिंदे, भगवान शेळके, बाबासाहेब शिंदे, मंगेश ठाकर, राजू खापरे, चंद्रकांता सोनकांबळे, गोपाळ मोरे, सचिन गायकवाड, उर्मिला काळभोर, अनिता तुतारे, सरिता साने, जितेंद्र ननावरे, किरण मोटे, राजेंद्र काटे, गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.
दापोडीतील फिरंगाई देवीच्या दर्शनाने या दौऱ्याला सुरुवात झाली. माजी नगरसेविका चांद्रकांता सोनकांबळे, संजय काटे, स्वाती काटे यांच्या कार्यालयात भेट दिली. विशाल वाळुंजकर, राजेंद्र काटे, शशिकांत देशपांडे, सचिन गायकवाड, विजय काटे, विलास काटे, बाळासाहेब ओव्हाळ, बाळकृष्ण जोशी आदींच्या निवासस्थानी भेट दिली. दापोडी परिसरातील शहिद भगतसिंग, नारायण दाभाडे, नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरवीर तानाजी मालुसरे, साईबाबा मंदिरात अभिवादन केले. दापोडीतील व्यापारी वर्गाला देखील भेट दिली. दापोडी येथील शिवसेना कार्यालयात खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उद्धव जाधव यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा न्यूमोनिया झाल्याने मृत्यू झाला. खासदार श्रीरंग बारणे यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
फुगेवाडी शिवसेना कार्यालयास भेट
फुगेवाडी येथील शिवसेना कार्यालयाला (शिवालय) खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. कार्यालयात स्थानिक महिला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक सूरदास गायकवाड, संजय फुगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी रेखा पटेल, उषा जाधव, कौशल्या जाधव, कस्तुराबाई अवसरमल, सकराबाई शेंडगे, दत्ता अवसरमल, युवराज गायकवाड, नंदू कांबळे, नरेंद्र कांबळे, मनोज काची, संजय साठे, योगेश मीरपगार आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group