पुणे (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सायंकाळी काळेपडळ, कोंढवा येथे महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा खासदार आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये सौ.वैशाली बाळासाहेब काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी वैशाली बाळासाहेब काळे यांची शिवसेना पुणे शहर समन्वयकपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group