पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडीतील भंगाराच्या दुकानांना लागलेल्या आगीत ४ दुकाने जळून खाक झाली आहेत पहाटे पाच वाजता ही आग लागली होती तर सुदैवाने यात कोणतीही जिवीतहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या आगीत भंगाराचे साहित्य, लाकूड फाटा, प्लायवूड, केमिकल साहित्य भस्मसात झाले आहे. आज पहाटे पाच वाजता लागलेल्या या आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राधिकरण, भोसरी, चिखली, तळवडे येथून महापालिकेच्या प्रत्येकी एक गाडी आग विझविण्यासाठी पाचारण झाली होती. त्याचप्रमाणे बजाज अँटो, टाटा मोटर्स, एमआयडीसी चाकण, फोर्स मोटर्स, सेन्युरियन एंन्का, जय हिंद इंडस्ट्रीजच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले असून मनोज मोरे, निकेश मोरे यांची चार गोडाऊन जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.





















Join Our Whatsapp Group