रसायनी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना ,भाजप,रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांनी रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिदु असणा-या मोहोपाडा व वावेघर बाजारपेठांतील दुकानदारांशी संवाद साधून रसायनी परिसर पिंजून काढला आहे. वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीतने हाती घेतल्याने रसायनीत त्यांना तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. त्यांचे सुपुत्र विश्वजित हे वडिलांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. विश्वजित बारणे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा मोहोपाडा येथे भेट दिली. सर्वप्रथम शिवाजी चौकातील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रचारकार्यास सुरुवात केली. यावेळी महायुतीच्या पदाधिका-यांच्या वतीने शिवसेना शाखेत स्वागत करुन मोहोपाडा बाजारपेठेतून प्रचार सुरु झाला. विश्वजीत बारणे यांच्यासोबत मोहोपाडा रसायनीतील शिवसेना -भाजप मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वजीत बारणे यांनी बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासोबत जिल्हा महिला आघाडीप्रमुख अनघा कानिटकर, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, विभागप्रमुख अजित सावंत, उपविभागप्रमुख कृष्णा पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, माजी उपसरपंच सदगुणा पाटील, संदेश जाधव, दत्ता खाने, युवा सेनेचे संतोष पांगत, स्वप्नील राऊत आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहोपाडा येथे विश्वजीत बारणे यांनी दुकानदारांशी संवाद साधून धनुष्यबाणाचे बटन दाबून बारणेंना विजयी करण्याचे आवाहन करीत नागरिकांशीही संवाद साधला. यानंतर वावेघर येथे श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पंण केला. वडिलांनी खासदार असताना केलेल्या विकासकामांचा आलेख विश्वजीत यांनी वाचला. यावेळी “कोण म्हणतो येणार नाही, हम तुम्हारे साथ है! अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.





















Join Our Whatsapp Group