पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीमध्ये मतदान हा आपला हक्क आहे, अधिकार आहे. प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला पाहिजे असे मत पार्श्वगायक सावनी रविंद्र हिने व्यक्त केले.
चिंचवड येथील माटे हायस्कूल येथे सावनीने दुपारी मतदान करून आपला हक्क बजावला. त्यानंतर बोलताना ती म्हणाली की, जसा मी मतदानाचा हक्क बजावला आहे, तसा प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपण आयुष्यात कुठल्याही स्तरावर असो कोणतेही काम करत असू, सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि भारतीय असल्याचा हक्क मतदान करून आपण बजावला पाहिजे. मतदान करून लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे अशी अपेक्षा सावनी हिने व्यक्त केली.