पुणे (Pclive7.com):- वडगाव धायरी येथील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर रस्त्यावर गोळ्या घालून आज सकाळी खून करण्यात आला. या मागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
हसन शेख हा सिंहगड रोड पोलीस स्टेशन व हवेली पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर हल्ला झाला होता. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.