पिंपळे सौदागर (Pclive7.com):- युवा नेतृत्व संकेत संजय कुटे यांचा वाढदिवस दि.११ मे रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपळे सौदागर येथे मोदी २.० ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मिशन डेव्हलप भारत, ईस्काॅन परिवार, गायत्री परिवार व जेष्ठ नागरीक संघटनेच्या वतीने कुणाल आयकाॅन रोड येथे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने पिंपळे सौदागर येथे विविध ठिकाणी वड, पिंपळ, चिंच,कडुलिंब, जांभुळ अश्या प्रकारच्या ५० देशी वृक्षांची लागवट करण्यात आली.

यावेळी प्रणय राज, राकेश खत्री, शिव सिंग, मिथुनजी, सुदीपजी, झोपे काका, नगरकर काका, मालामल काका, शुक्ला काका, राजेश पाटिल, विवेक तितरमारे, अनय मुळे, इंदु ताई, पुजा राजपुत, बाळासाहेब कुटे, चंद्रकांत कुटे, दत्तात्रय कुटे, राकेश भास्कर, इंद्रजीत काटे, विजय विकास सर, कुंभार काका, राजु मुरकुटे, सतीश परघळे, विशाल शिंदे, अभिजीत ऊल्हे, रमेश भिसे, आशिष शर्मा, संजय साहू, संदीप इंदे, दीपक मिश्रा, शिषीर पटेल, पारस साहु, चैतन्य पाटिल, अनिल मोटवानी, अल्पेश जैन,सचिन शर्मा, ब्रिजेश शुक्ला, संदीपजी उपस्थित होते.
यावेळी संकेत संजय कुटे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अश्या प्रकारच्या उपक्रमासाठी नागरीकांनी विनंतीला मान देऊन आपली उपस्थिती दर्शवली आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ह्या निस्वार्थ हेतुने सर्वांनी या कार्यामध्ये आपला हातभार लावला याबद्दल सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले. तसेच यापुढे देखील कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाने व सहायाने समाजात अश्या उपक्रमाच्या माध्यमातुन पर्यावरणाविषयी व स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group