मुंबई (Pclive7.com):- सुप्रीम कोर्टानं आज (मंगळवार) सकाळी उद्या (बुधवार) सायंकाळपर्यंत बहुमत सिध्द करण्याचा आदेश सरकारला दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय हलचालींना प्रचंड वेग आला. भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला. त्यांच्या पाठोपाठ आता भाजपाने मैदान सोडलं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिल्याने हे सरकार अवघ्या ७८ तासात कोसळलं आहे.
भाजपाचं सरकार कोसळलं; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा..!





















Join Our Whatsapp Group