पिंपरी (Pclive7.com):- चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्यानं पिंपरी चिंचवड शहर हादरलंय. शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाने हे कृत्य केलंय. याप्रकरणी रमजान बागवान याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नराधमाने दहा वर्षीय पीडितेवर दीड महिन्यात चार वेळा आणि चार वर्षीय पीडितेवर एकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नराधमावर पॉक्सो आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे आई-वडील, शेजारीचं राहणारे आज्जी-आजोबा आणि काका मजुरी करतात. याचं पीडित कुटुंबाच्या बाजूला राहणारा नराधम, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे मजुरीचं काम करतात.

चौथीत शिकणारी दहा वर्षीय पीडिता नेहमीप्रमाणे आज सकाळी आठ वाजता शाळेत गेली. अकरा वाजता ती घरी येईपर्यंत आई-वडील आणि शेजारी राहणारे आज्जी-आजोबा काका असे सगळेच कामावर गेले होते. शेजारी राहणाऱ्या नराधमाची बायको आणि मुलगा ही मजुरी करायला गेले, नराधम मात्र घरीचं थांबला होता. त्यावेळी दहा वर्षीय चिमुकली आणि तिची चार वर्षीय बहीण घरातली आवराआवर करत होते. दुपारच्या वेळी दहा वर्षीय चिमुकली कपडे धुण्यासाठी बाहेर आली, त्यावेळी नराधमाने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली आणि पीडितेचे तोंड दाबून लगतच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला. हे शेजारच्या एका महिलेनं पाहिलं. ही महिला पीडितेच्या आई-वडील कामावरून कधी येतायेत याची वाट पाहत राहिली. संध्याकाळी ते घरी येण्यापूर्वी नराधमाने अत्याचार करुन पीडितेला सोडून दिलं होतं. मात्र घरच्यांना सांगितलं तर चाकूने पोट कापेन अशी धमकी या नराधमाने चिमुकल्या पीडितेला दिली होती.

मात्र शेजारच्या महिलेने पीडितेच्या आई-वडिलांना गाठलं, दुपारी जे घडलं ते सांगितलं. मग पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन विचारलं असता, तिने आजचा घडलेला प्रकार सांगितला. इतकंच नव्हे तर मे महिन्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर तीन वेळा असं एकूण चार वेळा तोंड दाबून नराधम घेऊन गेला अन अत्याचार केला. असं पिडीतीने सांगताच, आईसह कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याहून धक्कादायक म्हणजे या नराधमाने काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बहिणीला ही एकदा तोंड दाबून घरी नेहले होते, हे सांगितल्यावर तर कुटुंबाला जबर धक्का बसला.
मग कुटुंबाने वाकड पोलीस स्टेशनला जाऊन ६५ वर्षीय नराधम रमजान विरोधात फिर्याद दिली, त्यानुसार नराधमावर पॉक्सो आणि येट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीनं नराधमाला बेड्या ही ठोकल्या आहेत.




















Join Our Whatsapp Group