पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही ॲड. कृष्णा भांगरे यांनी त्यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा केला.

वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे गोमातांसाठी चारा देण्यात आला. तसेच गोमातांवर उपचार करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत देऊन सेवाभावी कार्याला हातभार लावण्यात आला.

यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांमुळे ॲड. कृष्णा भांगरे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला असून त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

या प्रसंगी गोरक्षक महेश बालघरे, बंडू अण्णा भालेकर, अक्षय साने, सूरज रोकडे, आकाश साने, निलेश शिनगारे तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी ॲड. कृष्णा भांगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.




















Join Our Whatsapp Group