पिंपरी (Pclive7.com):- सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करुन संविधानाची पायमल्ली केली होती. सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाणा-या ‘मी पुन्हा येईन’ म्हणणा-यांची सत्तेची मस्ती सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उतरली आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले अभिवचन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुर्ण केले. यामुळे राज्यभरातील शिवसेनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी दिली.
मंगळवारी (दि.२६ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीने जाहीर केले. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून, फटाके फोडून उपस्थितांनी आनंद साजरा केला.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधूकर बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, कार्यालयीन सचिव ज्ञानेश्वर शिंदे, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, अमोल निकम, तुषार नवले, उपजिल्हा संघटिका स्वरुपा खोपकर, पिंपरी संघटक रोमी संधू, चिंचवड संघटक हरिश नखाते, पिंपरी संघटिका सरिता साने, चिंचवड संघटक संतोष सौंदणकर, महिला विभाग प्रमुख वैशाली माने, विभाग प्रमुख कुष्णा वाळके, नाना काळभोर, पिंपरी समन्वयक माधव मुळे, भोसरी समन्वयक दत्ता भालेराव, श्रीकांत चौधरी, विभाग प्रमुख विजय साने, राजेश वाबळे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व उपविभाग प्रमुख नितीन घोलप, उपविभाग प्रमुख गोरख नवघणे, बबलू शेखर, गणेश रोकडे, चंद्रशेखर कणसे, शाखा प्रमुख मनोहर कानडे, वैभव माने, पुरुषोत्तम वायकळ, निलेश खंडेराव, युवा सेनेचे गणेश आहेर, अभिजित गोफण, कुणाल तापकीर, मंगला भोकरे, अमय वाघ, प्रविण खिलारे, रवी राऊत आदी उपस्थित होते.
योगेश बाबर म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्ष जनतेची सेवा करेल. शेतकरी, कष्टकरी कामगारांचे, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा प्रथम क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास योगेश बाबर यांनी व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group