पिंपरी (Pclive7.com):- ३ डिसेंबर हा जागतिक अंपग दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत रहाटणी-पिंपळे सौदागर येथील, शिवशंभो सेवा मंडळाच्या सभागृहात स्माईल फाऊंडेशन आणि नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू अपंग, दिव्यांग व्यक्तींना व विद्यार्थ्यांना १५ व्हिल चेअर सायकलचे वाटप विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी, स्माईल फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, वाल्मिक कुटे, माजी नगरसेवक गुरूबक्ष पहलानी, पिपंरी चिंचवड कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष काळुराम कवितके, प्रहार संघटनेचे नयन पुजारी, कुलदिप माखले, संजय गायके, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, शंकरराव काटे, प्रसिद्ध निवेदक संतोष मल्हारी काटे, अर्जुनभाऊ काटे, राकेश नखाते तसेच परिसरातील नागरीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group