पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी आज त्यांनी संसदेत शून्यप्रहारामध्ये केली.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसृष्टी’ची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे. शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. सोबतच रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटनास चालना मिळेल. किल्ले शिवनेरीवरती जाण्यासाठी किल्ले आबाल-वृद्ध,माता-भगिनी यांना शिवजन्मभूमीवरती जाण्यासाठी रोप-वे ची निर्मिती करून द्यावी अशी सुद्धा आग्रही मागणी संसदेत केली.





















Join Our Whatsapp Group