पुणे (Pclive7.com):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुणे जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200101-WA0009-1024x512.jpg)
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.