पिंपरी (Pclive7.com):- इंग्रजी नववर्षाचे स्वागत दूध पिऊन करा, दारू पिऊन नका. दारू पिऊन गाडी चालवू नका, पोलीसांना सहकार्य करा असा संदेश पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपल्या कृतीतून देण्यात आला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, सत्येन भास्कर, शुभम चिंचवडे, सचिन लाड,अमेय देशपांडे, कोमल काळभोर, विशाल शर्मा, शुभम ससे, भाग्यदेव घुले, गणेश खोडके पाटील, सुमित काटे, युवराज इंगळे, आदिनाथ कड, गिरीश राजुरकर, संतोष बगाडे, अरुण शेंडकर,गोविंद लबडे, अक्षय ढवळे, ॠषीकेश दास, पंकज यादव उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे म्हणाले की, नागरिकांनी दारूसारख्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. ३१ डिसेंबर म्हटले, की दारू पिऊन सेलिब्रेशन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालविणे, यासारख्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते, तसेच दारूमुळे अपघात होतात. काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहीजण जखमी होतात. परिणामी त्यांच्या कुटुंबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी उचललेले एक पाऊल खूप महत्त्वाचे आहे.






















Join Our Whatsapp Group